हदगाव। हदगाव तालुक्यातील येवली ते शेटेवाडी वाळकी बाजार रस्त्यामधील नालीवरील फुल आजच्या पडलेल्या पावसामुळे दिनांक २/ ७ /२०२२ रोज शनिवार वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, वारंवार होणाऱ्या समस्येवर तोडगा काडून कायम समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील दोन वर्षापासून सतत शेतकऱ्यांच्या लोकवणीतून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु फार कमी शेतकऱ्यांची लोकवर्गणी होत असल्याकारणाने शेतकऱ्यांना पुरेशे त्यासाठी पैसे जमत नसल्याने सलग दोन वर्षापासून हा पूल वाहून जात आहे. तरी याची शासनाने दखल घेऊन तातडीने शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी पूल बनवुन द्यावा अशी मागणी केली जाते आहे.
पूल वाहून गेल्याने शेतमजुरांसाठी शेतीमधील पेरणी शेतातील कामे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता असल्याकारणाने येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची फार वाईट अवस्था झाली आहे. आजच्या पाऊस पेरणी योग्य झाला असून पेरणीसाठी जाण्यासाठी शेतकऱ्यांचे वाहने बैलगाडी शेतमजूर यांना अत्यंत त्रासदायक हा असा रस्ता बनला आहे. तरी शासनाने योग्य ती पाऊलं उचलून हा रस्ता सुरळीत चालू करण्यात यावा अशी गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे.