दहा नगरपरिषदांच्या आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना असल्यास 1 ऑगस्टपर्यत कराव्यात -NNL


नांदेड|
राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण(महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम-2022 जाहीर केलेला आहे.

या कार्यक्रमानुसार या दहा नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी 28 जुलै 2022 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी संबंधित नगरपरिषदेच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सदर आरक्षणाची प्रसिध्दी त्या दहा नगरपरिषदांच्या क्षेत्रात प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने संकेतस्थळावरही या आरक्षणाची प्रसिध्दी करण्यात आली आहे.

या आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींच्या हरकती व सूचना असतील त्यांनी कारणासह संबंधित नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांचेकडे शुक्रवार 29 जुलै ते सोमवार 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर करावे. 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी