परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने आधी स्वतःचे मूल्यमापन करावे - स्वप्निल इंगळे -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने आधी स्वतःचे मूल्यमापन करावे मग विद्यार्थ्यांचे करावे व दोषीनवर कड़क कारवाई करावी. किंवा संचालकांनी स्वता याची जबाबदारी स्वीकारून कार्यमुक्त व्हावे. असे मत काल विधी शाखेच्या चौथ्या सेमिस्टर परीक्षेतील गोंधळानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे पाटील यांनी व्यक्त केले. दोषीनवर कारवाईच्या मागणी चे पत्र निवेदनाद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री व कुलगुरू यांना पाठवले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एल.एल. बी च्या द्वितीय वर्षाच्या कॉन्टॅक्ट ऍक्ट 2 या पेपरच्या वेळेस विद्यार्थ्यांना सीबीसीएस येवजी सीजीपीए पॅटर्नची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यातही प्रश्नपत्रिकेत नऊच्या नऊ प्रश्न सोडविण्याचे सांगण्यात आल्याने या गोंधळात आणखी भर पडली.  ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर विद्यापीठाने 9 पैकी कोणतेही पाच प्रश्न सोडवावे असे तोंडी कळवले.

परीक्षा विभागाच्या गोंधळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला असता. त्यांना फक्त दहा-पंधरा मिनिटं अतिरिक्त वेळ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एवढ्यावरच न थांबता प्रश्नपत्रिकेत अनेक साध्यासाध्या स्पेलिंग मिस्टेकच्या अनेक चुका होत्या. पेपर 80 गुणांचा होता की 75 गुणांचा याचा संभ्रम अजून सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात आहे. या वरून परीक्षा विभाग हा परीक्षा बदल किती जागरुक आहे व सक्षम आहे हे निदर्शंनास येते. या निवेदनावर बबलू मुखेडकर ,निनाद काळे विक्रम ठाकुर, अंकुश शिकारे ,अजय कदम गोविंद मोरे, अजय जाधव, निखिलदेशमुख , अभिषेक पावडे,अजय हट्टेकर,शुभम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी