हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहरात परिसरात अगोदरच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असुन, चोरी दरोडे खुन बलात्कार सारख्या गंभीर घटना घडत असताना गावगुंडच्या वाढत्या कारवाया व आता तर चोरट्या महीलाचाही शिरकाव शहरात झाल्याने पोलीसांचा ताण वाढला आहे.
पोलिसाची संख्याबळ कमी यामुळे पोलिसासमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. शहरात चोर महीला ही सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. या पुर्वीच्या घटनेत भर वस्तीत एका मंगलसुञ चोराने टुव्हिलर येवून आपल्या घरासमोर बसलेल्या महीलेच मंगलसुञ हिसकावून नेले होते. त्याचा अध्याप शोध लागलेला नसतांना हदगाव शहराच्या बस्थानकात प्रवासी महीला बसमध्ये चढत असतांना तिच्या पाठीमागुन मानेवर कशाच तरी स्पर्श होत असल्याच जाणवले.
त्याचवेळी त्या महीलाने मागे वळुन पाहीले असता एक महीला आपल्या काखेत छोटे बाळ घेवून उभी होती. ती लगेच सरकत होती त्या प्रवासी महीलेच्या गळ्यातील पोताचे मणी गळून पडल्याचे लक्षात येताच आपल्या गळ्यातील पोत कुणी तरी घेत आहे. याची जाणीव झाल्याने त्या प्रवासी महीलाने आरडाओरडा केला असता त्या पाठीमागच्या महीला पळुन जात असल्याचे दिसल्या. त्याच वेळेस पोलिस उपनिरक्षक व इतर पोलिस मुख्यरोडवरुन जात असतांना त्या चोरट्या महीला पळत असतांना त्यांना दिसल्या.
त्यांना चौकशी करिता पोलिस स्टेशन मध्ये आणले असता चौकशी दरम्यान आढळून आले की, त्या दोन महीला अट्टल गुन्हेगार असुन, त्यांच्यावर पर्स पळविणे गळ्यातील मंगळसुञ हिसकावणे चो-या दरोडे असे नादेड परभणी व विदर्भातील आदी ठिकाणीच्या पोलिस स्टेशन मध्ये गंभीर गुन्ह्याची नोद असल्याची माहीती मिळाली.
महीला आरोपी पुजा पवार .व राधाबाई कांबळे ह्या महीला परभणी येथील असल्याची माहीती मिळाली प्रवासी महीलेच्या फिर्यादीवरुन पोलिस निरक्षक हनुंमत गायकवाड यांनी चोर महीलाच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरक्षकाच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरक्षक उमेश भोसले हे पुढील तपास करित असल्याची माहीती मिळाली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी भेटत नाहीत....? मागील महीण्यात हदगांव पोलिस स्टेशन अतर्गत फार मोठ्या घटना घडल्या. या घटनेच तपास उपविभागीय पोलिस अधिका-याकडे आसतो. या बाबतीत स्थानिय सामाजिक कार्यकर्ते व पञकारांनी या वरिष्ठ आधिका-याना भेटुन ह्या गंभीर घटना का घडत आहे. या बाबतीत भेटण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला असता त्यांनी स्थानिय पञकाराना भेटायच टाळल जात हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.