लोह्यात भूमिपुत्र डॉ धोंडे यांचे वृक्षारोपण ; स्वतः केले खड्डे; वृक्ष संवर्धनाचा उपक्रम -NNL


लोहा|
लोह्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रमोद वीरभद्र अप्पा धोंडे व त्यांचे सहकारी मित्र गेल्या आठ वर्षा पासून वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करतात स्वतः झाडे व त्याला जाळी असे सावली देणारे वृक्ष लागवड करतात. लोह्याच्या शिवछत्रपती विद्यालयात तसेच जुन्या शहरातील तनियोजित बुद्ध विहारात वृक्षारोपण त्यांनी केले.विशेष म्हणजे स्वतः डॉ प्रमोद यांनी खड्डे केले हे विशेष.

भूमिपुत्र डॉ प्रमोद धोंडे व टीम दरवर्षी वृक्षारोपण करतात त्याला जाळी बसवितात जुन्या लोह्यातील शिव छञपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,प्रमोद विरभद्र धोंडे, ( डी.एम.न्युराॕलाॕजीष्ट.) त्याचे वडील विरभद्र एकनाथ धोंडे आदर्श माता सौ.अरुणाबाई विरभद्र धोंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेत झाडे लावली. डॉ धोंडे यांच्याकडे रुग्ण व नातेवाईक यांची नेहमीच गर्दी असते या व्यस्ततेतुन वेळ काढील. 

डॉ धोंडे व त्यांचे माता पिता यांनी आपल्या कामाची प्रसिद्धी न करता शाळेच्या प्रांगणात ६० विविध प्रजातीची झाडे व त्याला जाळी लावली. प्रमोद धोंडे व टिमने त्यांनी त्यांच्या मुळगावी पेनुर येथे दोनशे वृक्ष लावली व ती जोपासली. आहेत पिंपळगाव,सुनेगाव मंदिर, बनवस येथेही वृक्षारोपण केले ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करतात व  त्या ठिकाणी स्वतः डॉ धोंडे  भेटी देतात. विविध शासकिय कार्यालयामध्ये त्यांनी रेन हार्वेस्टिंग करून दिले आहे यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, मुख्याध्यापक दामोदर वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख  गंगाधर पञे ,भगवान मटके  अनिल धुतमल , इमाम लदाफ,शाम नळगे,दिलीप कहाळेकर सर,राहुल पारेकर ,बाळू शेटे,विठ्ठल वडजे ,व्यंकट पवार हे उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी