मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास ६ महिन्याची मुदतवाढ -NNL

आ.डॉ तुषार राठोड यांच्या प्रयत्नांना यश


मुखेड, रणजित जामखेडकर।
मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मुदतवाढ द्यावी याबाबतचा प्रस्ताव आ . डॉ . तुषार राठोड यांनी तत्कालीन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दाखल केला होता . दरम्यान , राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपा शिंदे गटाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सदरचा प्रस्ताव आ . तुषार राठोड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत थेठ मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला . या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे , अशी माहिती मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ . डॉ. तुषार राठोड यांनी आज पत्रकारांना दिली . 

कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडच्या संचालक मंडळाची मुदत दि . २५ मे २०२२ रोजी संपली आहे . या संचालक मंडळास शासनाकडून सहा महिन्यांची मुदतवाढ भेटावी यासाठी आ . डॉ . तुषार राठोड यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन यासंबंधीचा प्रस्ताव माननीय पणन संचालक , पुणे यांच्यामार्फत शासनाला सादर केला होता ; परंतु मुदतवाढ संपल्यानंतरही राज्यातील महाविकास आघाडी सरकारतर्फे या संचालक मंडळाला मुदतवाढ दिली गेली नाही ; परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात येऊन पडल्यानंतर नवीन सरकारने या संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे . राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप व विस्तार न झाल्यामुळे सर्वच विभाग मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्यात आहेत . 

त्यामुळे हा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात जाऊन तिथून मंजुरी मिळणे आवश्यक होते आणि तसे पत्र आणि प्रयत्न आ. तुषार राठोड यांनी देऊन संचालक मंडळाला दि . २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंतची मुदतवाढ मिळविली आहे . बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे . बाजार समितीला मुदतवाढ मिळवून देणाऱ्या आ . डॉ . तुषार राठोड व विद्यमान सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर यांनी आमदारांचे आभार मानले आहेत तर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आ.राठोड व सभापती , संचालक संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी