आता नगराध्यक्ष सरपंच थेट जणतेतून निवडला जाणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL


मुंबई।
नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार असून, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच राज्यात पेट्रोलच्या करात 5 रुपये आणि डिझेलच्या करात 3 रुपये कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठक निर्णय -  राज्यात राज्यात पेट्रोलच्या करात 5 रुपये आणि डिझेलच्या करात 3 रुपये कपात, "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.०  (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार, राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार,  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार असेही निर्णय घेण्यात आले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी