नांदेड| मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्ते व पुलावरुन पाणी वाहत आहे.
रस्त्यावरुन व पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणाहून वाहतूक करु नये. अशा वेळेस वाहतूक केल्यास व्यक्तीची जिवीतीहानी तसेच त्यांच्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे नागरिकांनी खबरदारी घेवून प्रवास करावा व अनावश्यक रस्ते अपघात टाळावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह माहूर येथे आदिवासी मुलांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. या वसतिगृहात शासकीय नियमानुसार इयत्ता आठवी ते पदवीत्तर पदवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सोईसुविधा शासनाच्यावतीने देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर अत्यावश्यक कागदपत्रासह 20 ऑगस्ट 2022 पर्यत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.