नविन नांदेड। श्रावणमास निमित्ताने नरोबा मंदीर कौठा येथे २९ जुलै रोजी सकाळी महाअभिषेक व महापुजा , महाप्रसादाचे आयोजन नगरसेवक राजू पाटील काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावणमास निमित्ताने जुना कौठा नांदेड येथील जागृत देवस्थान असलेल्या नरोबा मंदीर कौठा येथे २९ जुलै रोजी सकाळी महाअभिषेक व महापुजा झाल्या नंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे व आमदार अमर राजूरकर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा आयोजित करण्यात आली आहे.महापुजा नंतर भाविक भक्तांसाठी ९ ते १ दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे,या महाप्रसाद चा लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन नगरसेवक राजू पाटील काळे ,महेद्र पाटील काळे, शंकर स्वामी यांनी केले आहे.