किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील १० जिल्हा परिषद गट पैकी ६ जिल्हा परिषद गट अनुसुचित जाती व जमाती करिता -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील १० जिल्हा परिषद गट पैकी ६ जिल्हा परिषद गट अनुसुचित जाती व जमाती करिता आरक्षित झाले आहेत. आज नांदेड येथे संपन्न झालेल्या आरक्षण सोडवणुकी कार्यक्रमानंतर अनेक प्रस्तापित विस्तापित झाले असुन आता सर्वच राष्ट्रीय व राज्य पक्षांच्या दुस-या फळीतील युवक उमेदवारांना यामुळे संधी प्राप्त होणार आहे.

किनवट – माहुर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण १० जिल्हा परिषद गट तर २० पंचायत समिती गण आहेत यावेळी प्रत्येकी १ जिल्हा परिषद गट दोन्ही तालुक्यात वाढला असुन यामध्ये किनवट तालुक्यात नव्याने मोहपुर हा गट निर्माण करण्यात आला आहे तर उमरी बा. गटाचे नाव सारखणी असे करण्यात आले असुन त्याच्या संरचनेत हि बदल करण्यात आला आहे. १० पैकी ६ जिल्हा परिषद गट किनवट विधानसभा क्षेत्रातील आरक्षित झाल्याने अनेकांचे धाबे दणानले आहे तर अनेकांनी डोक्याला बाशिंग बाधले आहे.

किनवट तालुक्यातील बोधडी गट अनुसुचित जाती करिता राखिव झाला असुन यामुळे जिल्हा बॅकेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, भाजपा तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे या पारंपारीक विरोधकांना देखिल नविन गटचा आधार घ्यावा लागणार आहे तर याच मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे गजानन मुंडे, बालाजी भिसे, बालाजी बामणे , भाऊराव राठोड, रमेश राठोड, कराड यांच्यासह अनेक उमेदरांनी बाशिंग बाधुन ठेवले होते त्यांचा हि हिरमोड झाला आहे. बहुप्रतिक्षित असा गोकुंदा जिल्हा परिषद गट हा देखिल अनुसुचित जाती प्रवर्ग महिला करिता आरक्षित झाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ संगिता म्याकलवार, भाजपा तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, शिवसेना उध्दव ठाकरे गट तालुका अध्यक्ष बालाजी मुरकुटे,  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश राठोड, गोकुंदा चे उपसरपंच शेख सलिम, पांडुरंग राठोड, बालाजी बामणे, शेख सरु, सतिष बोंतावार यांचा हि हिरमोड झाला आहे. 

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण पुढील प्रमाणेः इस्लापुर, बोधडी, मोहपुर(महिला), गोकुंदा (महिला) अनुसुचित जाती, मांडवी, सारखणी, जलधारा सर्वसाधारण खुला प्रवर्गा तर पंचायत समिती गण सारखणी खुला महिला, उमरी बा नागरीकांचा मागास प्रवर्ग, मांडवी नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, कोठारी सी अनुसुचित जमाती, मोहपुर सर्वसाधारण, घोटी अनुसुचित जाती, गोकुंदा सर्वसाधारण महिला, चिखली बु अनुसुचित जमाती महिला, बोधडी बु अनुसुचित जमाती, अनुसुचित जमाती महिला, परोटी तांडा सर्वसाधारण, इस्लापुर सर्वसाधारण महिला, शिवणी सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी