‘स्वारातीम’ विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगष्ट रोजी व्याख्यान -NNL


नांदेड|
जनवादी साहित्यिक, प्रतिभावंत लेखक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने ‘परिवर्तनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ या विषयावर औरंगाबाद येथील डॉ. कैलास अंभुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. १ ऑगष्ट, रोजी दु. १२:०० वा. करण्यात आले आहे.

व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे असणार आहेत. या व्याख्यानास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी