जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न -NNL


नांदेड|
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्हयातील विविध कौशल्य विकास योजनेबद्दल आढावा घेण्यात आला. 

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातर्गंत उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, उप अधिष्ठाता हेमंत व्ही. गोडबोले, सहायक प्राध्यापक डॉ. आय. एफ. इनामदार व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, आरएमओ डॉ. मंजुषा यशवंत पाटील, डॉ.शितल ओमकारसिंग चव्हाण, सहायक प्राध्यापक डॉ. दिपाली रमाकांत शेरेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद देशपांडे यांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या बैठकीस पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.आर.केंद्रे, महानगरपालिकेचे उपआयुक्त पंजाब खानसोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम, सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम.एस.बिरादार, जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बाऱ्हाते, मर्चन्ट ॲण्ड इंडीयन असोसीएशनचे अध्यक्ष हर्षद शाह, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सी.आर.राठोड, आत्मा कार्यालयाचे आर.बी.चलवदे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य यांची उपस्थित होती.

 सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सरदार पटेल राष्ट्रीय एकता दिन 31 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा करण्यात येतो. देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व योगदान देणाऱ्या आणि उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्थाना राष्ट्रीय एकता दिनाच्या दिवशी सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सन 2022 साठी ऑनलाईन अर्ज 31 जुलै पर्यंत मागविण्यात आले आहे. या प्रस्तावाबाबत संपूर्ण माहिती www.awards.gov.in चे वेबसाईट वर उपलब्ध आहे.  राष्ट्रीय एकता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी ज्यांनी कार्य केले किंवा सशक्त भारत निर्माणात सहभाग असलेल्या व्यक्ती, संस्था व  संघटनानी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी