छत्रपति शिवाजी महाराज ब्रिगेडची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
नांदेड| राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे त्वरित पंचनामे करून सरसकट 50 हजार रूपयाची नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ प्रणित छत्रपति शिवाजी महाराज ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ प्रणित छत्रपति शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष गिरीशभाऊ जाधव व प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर, प्रदेश कोषाध्यक्ष संजय कदम, प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर काकडे, प्रदेश प्रवक्ते अॅड.दिगांबर देशमुख, प्रदेश सचिव देविदास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.18 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी विपीन ईटकन यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील खराटे, जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील ढाकणीकर, ज्ञानेश्वर पाटील कदम, यशवंत पाटील आवाळे, राम पाटील कदम, संतोष पाटील कपाटे, शिवराज पाटील पाटणे आदींची उपस्थिती होती.