नांदेड। ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांचे वाढत्या गुणवत्तेचा विचार करून व अजून गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यास अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या नांदेड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने समाजातील दहावी व बारावी गुणवत्तेत पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. हा सत्काराचा कार्यक्रम दि. ३१ जुलै रोजी दुपारी एक वाजता दीनदयाल जुनिअर कॉलेज मालेगाव रोड नांदेड येथे करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाच्या आयोजकांकडून पत्रकाद्वारे मिळाली.
ब्राह्मण समाज गुणवत्तेत पहिल्यापासून अग्रेसर राहिला असून आपल्या गुणवत्तेवरच प्रगती करत राहिला. सध्याच्या युगात शैक्षणिक स्पर्धा वाढली असली तरी समाजातील बरेच विद्यार्थी गुणवत्तेत अग्रेसर आहेत. नुकत्याच झालेल्या मार्च एप्रिल २०२२ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन समाजाची शैक्षणिक दृष्ट्या मान गर्वाने उंच करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्याचे आयोजन अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ नांदेड जिल्हा कार्यकारिणीने केले आहे. सदरील कार्यक्रम ३१ जुलै रोज रविवारी दुपारी एक वाजता दीनदयाल ज्युनिअर कॉलेज मालेगाव रोड एनसीसी च्या ऑफिस समोर नांदेड येथे संपन्न होणार आहे. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष मा. प्रदीप कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तर उद्घाटक म्हणून मा. प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. नांदेड हे राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमात महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, मराठवाडा अध्यक्ष बबनराव कुलकर्णी, मराठवाडा कार्याध्यक्ष अरुण जोशी, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, ब्राह्मण महासंघ नांदेड जिल्हाध्यक्ष दीपक भोरे, ब्रह्म महाशिखर माजी अध्यक्ष निखिल लातूरकर, पुरोहित संघाचे नांदेड अध्यक्ष गजानन कळगावकर ,अनिल डोईफोडे, चाणक्य ब्राह्मण महासंघाचे नांदेड अध्यक्ष अभिजीत आडगेकर, सुभाषराव डोईफोडे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरील कार्यक्रमात अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या कार्यकारिणीच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
तसेच नांदेड मधील ब्राह्मण समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या इतर मान्यवरांचा तसेच संस्थांच्या अध्यक्षांचा प्रतिनिधी स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे .तरी ब्राह्मण समाजाने जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन बंडोपंत कुंटूरकर नांदेड जिल्हाध्यक्ष, सौ सुमती व्याहाळकर महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष, सौ अपर्णा नेरळकर महिला व बालकल्याण सभापती मनपा नांदेड, आशा पारवेकर, सखारामपंत कुलकर्णी, प्रा. रमाकांत जोशी चिखलीकर जगदीश कुंटूरकर, धनंजय देशमुख, दुर्गादास देशमुख व इतर संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.