सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसी प्रवर्गातील ५ सदस्यांना मिळणार प्रतिनीधीत्वाची करण्याची संधी
मुखेड , रणजित जामखेडकर| मुखेड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या १० प्रभागातील २० सदस्यांच्या निवडीसाठी निवडणुक विभागाकडून तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा आरक्षण झाली. दि.१३ जुन रोजी काढण्यात आलेले आरक्षण सोडत रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने दि.२० जुलै रोजी दिलेल्या निकालानुसार ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासह आज फेर आरक्षण सोडत संपन्न झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुखेड नगर पालिकेमध्ये यापूर्वी एकुण ७ प्रभाग होते त्यामधे १७ नगरसेवक निवडून येत होते. परंतु आता नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार शहरात एकूण १० प्रभाग झाले असून या १० प्रभागात नगरसेवकांची संख्या २० झाली लवकरच होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासह फेर आरक्षण सोडत मुखेड तहसील कार्यालयात काढण्यात आली.
यामध्ये प्रभाग क्र.१ अ) ना.मा.प्र स्त्री,ब) सर्वसाधारण,प्रभाग क्र.२ अ ) अनुसुचित जाती ब) सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र. ३ अ)अनुसुचित जाती महिला ब) सर्वसाधारण,प्रभाग क्र.४ अ) ना.मा.प्र.महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.५ अ) अनुसुचित जाती महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.६ अ) अनुसुचित जमाती ब) सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.७ अ) अनुसुचित जमाती महिला ब) सर्वसाधारण,प्रभाग क्र.८अ) ना.मा.प्रवर्ग ब)सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.९ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.१० अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण अशा पद्धतीने २० जागेसाठी आज फेर आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी देगलुरचे उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा ,न.प चे मुख्याधिकारी धनंजय थोरात, शिवशंकर कुचेवाड ,सुधीर सरोदे, यांच्या सह नगर परिषदचे कर्मचारी व शहरातील विविध राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.