नांदेड| मागील ५१ दिवसापूर्वी झालेल्या प्रसिद्ध बिल्डर्स संजय बियाणी यांच्या हत्ये प्रकरणी नांदेड पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. आत या हत्या प्रकरणातील आरोपींची सांख्य ७ झाली आहे. याबाबत नांदेड पो. स्टे. विमानतळ, येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील ६ आरोपी विविध राज्यातून अटक करण्यात आली असून, ०१ जून रोजी या गून्हयातील आणखी एक आरोपी पंजाब राज्यातून ताब्यात घेतल्याची माहिती जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.
दि. ०५ एप्रिल २०२२ रोजी बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांचे हत्या झाल्यानंतर या प्रकरणी पो. स्टे. विमानतळ, नांदेड येथे गूरनं ११९/२२ कलम ३०२, ३०७, १२० (ब), ३४ भादंवि सहकलम ३/२५ आर्म ऍक्ट प्रमाणे गून्हा दाखल झाला आहे. आरोपीना टाका करण्याच्या मागणीसाठी आंदोलने झाली त्यानंतर सदर गून्हयाचा तपास एसआयटी कडे देण्यात आला. एसआयटीने विविध राज्यात जाऊन ६ आरोपीना अटक केल्याची माहिती कालच पोलीस उपमहासंचालक निसार तांबोळी यांनी दिली होती. आणखीनही आरोपींचा यात समावेश असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती.
सदर गुन्हयामध्ये हरदिपसिंघ ऊर्फ हार्डी सपूरे रा. यात्रीनिवास रोड नांदेड यांचा सहभाग असल्याची व तो पंजाब राज्यामध्ये पळुन गेल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. सदर आरोपीस पकडण्यासाठी सपोनि पी.डी. भारती व स्टाफ यांचे पथक तयार करुन पंजाब येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने श्री शमींदरसिंघ धनोह पोलीस निरीक्षक सीआयस्टाफ, प्ाटीयाला पंजाब राज्य व त्यांचा स्टाफ यांच्या मदतीने हरदिपसिंघ ऊर्फ हार्डी बबनसिंग सपूरे वय 28 वर्षे रा. यात्रीनिवास रोड नांदेड यास पटीयाला पंजाब राज्य येथुन ताब्यात घेवून एस.आय.टी. समोर हजर केले. सदर आरोपीचा तपासामध्ये गुन्हामध्ये सहभाग आढळुन आल्याने दिनांक ०१ जून २०२२ रोजी अटक करण्यात आली. या आरोपीस आज रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्याची दिनांक १० जून २०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.