मुंबई| नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत पंडितराव विष्णुपूरीकर यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र मुंबईचा कै. यशवंत पाध्ये पुरस्कार 2022 देण्यात येत असल्याची घोषणा मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संस्थापक, अध्यक्ष श्री एकनाथरावजी बिरटवकर यांनी केले असून हा पुरस्कार 4 जानेवारी 2022 रोजी मुंबई येथील मराठी ग्रंथ संग्रहालय डॉ.सुरेद्र गावस्कर सभागृह दादर मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र मुंबई या राज्य स्तरीय संस्थेच्या 21 वा वर्धापन दिन सोहळा या निमित्ताने पत्रलेखकांचे राज्य स्तरीय संमेलन 4 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. याच सोहळ्यात “दर्पणकार” “बाळशास्त्री जांभेकर स्मृति पुरस्कार” ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि “कै. यशवंत पाध्ये” “स्मृति पुरस्कार” नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत विष्णुपूरीकर यांना प्रदान करण्यात येत आहे.
या समारभांचे अध्यक्ष मा.श्री. सुकृत खांडेकर (ज्येष्ठ पत्रकार, संपादक दैनिक प्रहार) तर प्रमुख अतिथी मा.श्री. भारत सासणे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व मा.श्री.ए.के.शेख (सुप्रसिद्ध कवी, गझलकार), मा.डॉ. लक्ष्मण शिवणेकर (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक) या मान्यवराच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमात “रंगतदार” प्रकाशन निर्मित आणि सौ. वंदना एकनाथ बिरवटकर लिखीत ‘काव्यवंदना’ आणि ‘हृदन’ या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते होणार आहे.