सह्याद्री शाळेच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर; २ लक्ष ११ हजार रुपयांचे बक्षीस - NNL


लोहा|
स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली यात १ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २ लक्ष ११ हजार एवढ्या रक्कमेची बक्षीसे ठेवण्यात आली होती. सह्याद्री शाळा गुणवते सोबतच नवोउक्रम राबविते शिवाय प्रशस्त इमारत व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या शाळेत केला जातो .संचालक सुदर्शन शिंदे व सौ जयश्री शिंदे या दाम्पत्यांनी राबविलेले उपक्रम तालुक्यात, जिल्ह्यात  पथदर्शी ठरले आहे.परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने  तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपला स्वतंत्र पॅटर्न तयार केला आहेसुदर्शन शिंदे  आणि सौ जयश्री सुदर्शन शिंदे या दाम्पत्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टाकले पाहिजे या साठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते त्यात १ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तीन गटात ही परीक्षा झाली. 

अ गटात - इयता 8 ते १०वी , ब -गटात इयता ५ वी ते ७ वी तर प्रथम-३१ हजार, द्वितीय-२१ हजार, तृतीय -११ हजार, गट क - इयता १ ली ते ४ थी या वर्गाचा समावेश होता .प्रत्येक गटात प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस -२१ हजार रुपये तर तृतीय बक्षीस ११हजार रुपये होते. 

गट `अ- प्रथम-प्रथमेश धनंजय संगवे.( वर्ग 8 वी) प्रथम बक्षीस 31,हजार  रुपये)द्वितीय -आदिनाथ माधव कुरूडे (वर्ग 9 वी द्वितीय बक्षीस 21हजार  रू) तृतीय - शिवम गंगाधर चांदणे( वर्ग 8 वी तृतीय बक्षीस 11हजार  रू) 

गट ब - सोहम मोहन पवार वर्ग 5 वी प्रथम बक्षीस 31हजार  रू शिवम कोंडीबा धुळगुंडे  वर्ग 5 वी द्वितीय बक्षीस 21हजार  रू आदित्य आंगद सूर्यवंशी वर्ग 5 वी तृतीय बक्षीस 11हजार  रू 

गट क- कु.श्रावणी संदीप सोनवळे वर्ग 4 थी प्रथम बक्षीस 31हजार  रूपये , अरव चंद्रकांत वाडकर वर्ग 4 थी द्वितीय बक्षीस 21हजार  रुपये,  शौर्य रवी आंबेकर वर्ग 2 री तृतीय बक्षीस 11हजार रुपये 

प्रोत्साहनपर बक्षीस - अथर्व बस्वराज लोहारे, तन्वी विष्णू लोखंडे,सुदर्शन सखाराम चांदणे, पांडुरंग बालाजी पळसे, रोहित रामदास कदम, ,वैष्णवी मारोती शिंदे,दिनेश दिपकराव भुरे,शिवम नागनाथ मुंडे,गजानन धोंडीबा मुंडे,संगम उत्तम देवकत्ते,संदेश शैलेंद्र सुर्वे,तनया उमाकांत येरमवार, सुशांत श्रीनिवास मोरे,अनिकेत बापूसाहेब कापुरे, आदित्य सूर्यकांत वसमतकर पृथ्वीराज राजू सूर्यवंशी,सुयश दिपकराव भुरे,गोविंद माधव केंद्रे,गायत्री गीताराम डवरे,दर्पण धोंडीबा वाघमारे,अंजली किशोरीलाल वाघमारे, सौम्य शिवानंद होनराव,मुकुंद रामकिशन केंद्रे,स्वप्निल माणिक आवळे,सत्यम अरविंद लोखंडे, सिद्धी रावसाहेब गवते,सुमित शिवाजी राठोड, अनुष्का बालाजी वाघमारे,गणेश दिगंबर लोखंडे, तेजस्विनी भगवान ढेपे,सक्षम जगन्नाथ सोनवळे, शशांक श्रीधर लुंगारे,आराध्या शिवाजी तोल्डी,कृष्णा शिवराज मोरे, अद्वित सुनील ब्याळे, मानसी शशिकांत शेटे,आर्या मन्मथ पेठकर,अर्णव बस्वराज लोहारे, अन्वी भगवान जाधव, समृद्धी लक्ष्मण दुधाटे, मनस्वी मल्लेश सगर,शौर्य देवराव भालेराव, वैभव देविदास भालेराव,रितेश ज्ञानेश्वर दळवे, सह्याद्री सुदर्शन शिंदे,समीक्षा संदीप चव्हाण,युवराज दिगंबर कदम हे विद्यार्थी गुणवंत ठरले आहेत 

या स्पर्धा परीक्षेचे नियोजन नंदकिशोर मेकाले यांनी केले त्यांना सहाय्यक शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुप्रिया वाडेवाले पर्यवेक्षक काशिनाथ पांचाळ, रुख्मिणी धोंडगे, अमोल शिरसाट यासह शिक्षक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. आणि या परीक्षेचा निकाल ही दिलेल्या वेळेत जाहीर करण्यात . ज्यांना निकाल मिळाला नसेल त्यांनी 9921210333 या वर विद्यार्थ्यांचे नाव व वर्ग टाकून व्हॉट्स अप मेसेज करावा असे सांगण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी