हस्सापुर येथील राजे खंडेराव होळकर चौक येथील पोलीस चौकी पोलीस प्रशासनाचा पळविण्याचा प्रयत्न अपयशी NNL

आमदार बालाजी कल्याणकर यांच्या तत्परतेमुळे पोलीस चौकी पुनर्स्थापन


नांदेड,आनंदा बोकारे।
मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात नागरिकांतून होत असलेली पोलिस चौकीची मागणी आमदार बालाजी दादा कल्याणकर यांच्यात तत्परतेमुळे पोलीस चौकीची मागणी पूर्ण झाली आमदार बालाजी दादा कल्‍याणकर व पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते मागील एक वर्षापूर्वी पोलीस चौकी स्थापन झाली.

 पोलीस चौकी स्थापन झाली पण कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कर्मचारी कधीतरी दोन दिवसाला चार दिवसाला तिथे बसायचे आणि तिथला काहीसा लुटमारीचे प्रकरण थांबला होता रविवारी दि 5/6/2022 रोजी अचानक पोलीस प्रशासनाकडून जेसीबी कंटेनर व पोलीस कर्मचारी पोलीस चौकी जवळ आले आणि जेसीबीच्या साह्याने पोलिस चुकीच्या चारही बाजूने खोदकाम करून पोलीस चौकी कंटेनर च्या साह्याने असर्जन मार्गे नेण्याचा प्रयत्न केला.


परंतु हस्सापुर नसरतपुर ग्रामपंचायतचे सरपंच देवीदास सरोदे व शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे व ग्रामपंचायत सदस्य  बालाजी चितगीरे यांनी आमदार बालाजी दादा कल्याणकर यांना पोलीस चौकी देण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दूरध्वनी द्वारा कळविले व आमदार साहेबांना ही बातमी कळताच आमदार साहेबांनी दूरध्वनी द्वारा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला व काही वेळातच पोलीस चौकी तिथे आणून ठेवली पण तिथे तुटलेली फुटलेली पोलीस चौकी आता दुरुस्ती करून कर्मचारी 24 घंटे कर्मचारी बसविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी