नांदेड। करमाड ते बदनापूर दरम्यान उड्डाण पुलाचे कार्य सुरु आहे. या करिता पाच दिवस लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक 11, 13, 15, 18 आणि 20 जून, 2022 रोजी दुपारी 15.15 ते 18.15 दरम्यान तीन तास घेण्यात येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस पाच दिवस उशिरा सुटणार आहे.
1. गाडो संख्या 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस दिनांक 11, 13, 15, 18 आणि 20 जून, 2022 रोजी औरंगाबाद येथून तिची नियमित वेळ दुपारी 16.15 वाजता सुटण्या ऐवजी 160 मिनिटे उशिरा सुटेल म्हणजेच सायंकाळी 18.55 वाजता सुटेल.
2. गाडी संख्या 17661 काचीगुडा ते रोटेगाव हि गाडी दिनांक 11, 13, 15, 18 आणि 20 जून, 2022 रोजी परभणी ते जालना दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल.
पूर्णा – नरसापूर दरम्यान विशेष रेल्वे
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पूर्णा – नरसापूर दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे :
अनु क्र. | गाडी संख्या | कुठून – कुठे | गाडी सुटण्याची वेळ | गाडी पोहोचण्याची वेळ | गाडी सुटण्याची तारीख - 2022 |
1 | 07287 | पूर्णा – नरसापूर | 12.45 (गुरुवार ) | 04.30 (शुक्रवार) |
09 जून |