चोरीच्या १९ मोटार सायकलसह एकास अटक; लातूर जिल्ह्यातील पाच गुन्हे उघडकीस -NNL


लातूर|
चोरीच्या १९ मोटार सायकलसह एका आरोपीस अटक, लातूर जिल्ह्यातील पाच गुन्हे उघडकीस आले असून, चोरट्याकडून ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे निलंगा यांनी कारवाई केली आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या माला विषयक विशेषतः मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात विशेष तपास पथके तयार करण्यात आली होती. दिनांक २९/०५/२०२२ रोजी पोलीस स्टेशन निलंगा येथे दाखल असलेलया गुरनं.१४९/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. (मोटार सायकल चोरी) मधील चोरीला गेलेल्या मोटरसायकल व आरोपीचा शोध सुरू असताना तपास पथकाला गोपनिय माहीती मिळाली की, बसस्टॅन्ड निलंगा परीसरात एक संशयीत इसम व त्याचा एक साथीदार असे मिळून चोरीची मोटार सायकल विकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनात तपास पथक सदर ठिकाणी पोहोचले पोलीस आल्याचा संशय आल्याने संशयीत इसम पळण्याचा प्रयत्न करीत असताना तपास पथकातील पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडून पोलीस स्टेशनला हजर केले. पोलीस निरीक्षक शेजाळ यांनी व तपास पथकाने त्या संशयीत इसमांकडे कसून चौकशी केली असता त्यातील एका संशयीत ईसमांने त्याचे नाव लक्ष्मण संजय सुर्यवंशी, वय २१ वर्ष, रा. तुगाव(हालसी) ता. हुलसुर जि.बिदर, एक विधी संघर्ष बालक असे असून चौकशी दरम्यान त्यांने पोलीस स्टेशन निलंगा, औराद शहाजानी, लातूर शहर येथून तसेच कर्नाटक राज्यातील बस्वकल्याण भालकी, बिदर येथून मोटार सायकली चोरी केल्याबाबत माहीती दिली. 

या माहीतीवरून पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार यांचे  दोन पथक तयार करून पुढील तपास कामी रवाना करण्यात आले. तपास पथकांनी चोरीच्या मोटार सायकली ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला हजर केल्या. तपासात पोलीस स्टेशन निलंगा येथील (१) गुरनं.२४५/२०१८ कलम ३७९  भा.द.वि. (२). गुरनं.१४९/२०२२ कलम ३७९, ३४ भा.द.वि. (३).गुरनं.१०८/२०२२ कलम ३७९ भादवी(४) औराद शहाजानी पोलीस स्टेशन येथील गुरनं.४१/२०२१ कलम ३७९ भा.द.वि.(५) गुरनं.८१/२०२१ कलम ३७९ भा.द.वि. गुन्हे निष्पन्न झाले आहेत. सदर गुन्हयात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान एकूण १९ मोटार सायकली ज्यांची किंमत ७ लक्ष ५०,०००/- रूपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन निलंगा येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास सुरू असून निलंगा पोलीस स्टेशनचे सफौ बानाटे व पोलीस नाईक सुधीर शिंदे हे करीत आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे, गोविंद राठोड, सपोउपनि बानाटे, पोलीस अमलदार विजयकुमार बिरादार, सुधीर शिंदे, निकमसिंग चव्हाण, शरद माने, बाळासाहेब नागमोडे, नितीन मजगे, बालाजी सोमवंशी, बळीराम मस्के, दिपक थोटे, संतोष कलबोने, बाबासाहेब जगताप तसेच चालक सफौ म्हेञे, पोकॉ जगदीश मुळे, नामदेव सगर, गोविंद बेंबडे यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी