नांदेड। भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या कुटुंबाने नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा चे दर्शन घेऊन माथा टेकला. तत्पूर्वी माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन करून ते नांदेड येथे आले होते.
नानक साई फाऊंडेशन च्या टीमने तृप्ती देसाई यांच्या कुटुंबाचा नांदेड येथे पाहुणचार केला, त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागताला नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, डॉ जयप्रकाश नागला, सुधाकर पिलगुंडे, गंगाधर पांचाळ, डॉ गजानन देवकर, दयानंद बसवंते, धनंजय उमरीकर,श्रेयस कुमार बोकारे, पुंडलिक बेलकर हे उपस्थित होते.भूमाता ब्रिगेड च्या प्रमुख तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे वडील तथा
पुणे येथील दत्त गगनगिरी अवतार मठाचे मठाधिश राजयोगी दत्ताजी शिंदे महाराज व राजयोगी गुरुनाथ गिरी महाराज यांनी आज नांदेड येथे गुरुद्वारा दर्शन घेतले, यावेळी गुरुद्वारा च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.. दरम्यान त्यांनी लंगर साहिब गुरुद्वारा चे मौजुदा मुखी संत बाबा नरेंद्रसिंघ जी यांची त्यांनी भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तुळजापूर कडे रवाना झाले.. सचखंड गुरुद्वारा, लंगर साहिब आणि टीम नानक साई ने केलेल्या आदररतिथ्याने तृप्ती देसाई यांचे कुटुंब भारावून गेले, राजयोगी मठाधिश दत्ताजी शिंदे महाराज यांनी गुरुद्वारा दर्शनाने आपण धन्य झालो,समाधान मिळाले अशी भावना व्यक्त करत ते तुळजापूर कडे रवाना झाले. या वेळी त्यांच्या सोबत गौरव दंडवते,सुधाकरराव कोसंबे पाटील,रेणुका देसाई, अनिता शिंदे, तेजश्री दंडवते हे होते.