लोहा। या राष्ट्रीय महा मार्गावरील शहरात ट्रॉमा केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर तसेच प पू येलेराज बाबा पालमकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कौशल्या ट्रॉमा केअर सेन्टरमुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांचे चिरंजीव डॉ प्रमोद पाटील , डॉ हर्षवर्धन टेळकीकर, डॉ विजय गायकवाड, व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने लोह्याच्या वैदयकीय सुविधेत आणखी एका दर्जेदार हॉस्पिटलची भर पडली. कौशल्या टॉमा केअर ॲन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा शुभारंभ युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर व प. पु . येलेराज बाबा पालमकर यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार , नगराध्यक्ष, गजानन सूर्यवंशी , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल बारी, काँग्रेस शहराध्यक्ष वसंतराव पवार, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, माजी माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , नगरसेवक भास्कर पाटील पवार, माजी नगरसेवक अपाराव पवार, नगरसेवक संभाजी चव्हाण, श्याम पाटील पवार नगरसेवक ,बबन निर्मले डॉ.सचिन पाटील उमरेकर, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ मिलिंद धनसडे , प्रसिद्ध अस्थिरोग्य तज्ज्ञ अभिजित शिंदे,डॉ.मनोज घंटे, हृदयरोग तज्ज्ञ , डॉ राजेश पवार, प्रसिद्ध सर्जन डॉ गणेश चव्हाण, डॉ प्रशांत जाधव, डॉ लोहारे, सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ सुर्यवंशी , डॉ मंगनाळे, गोपाळ पाटील पवार,ओमकार पवार,माधव क्षीरसागर, सिध्दार्थ ससाणे, यासह मान्यवर उपस्थित होते.
हॉस्पीटल मध्ये डॉ. विजय गायकवाड , प्रसिद्ध अस्थिरोग्य तज्ञ डॉ. हर्षवर्धन टेळकीकर जनरल सर्जन डॉ. विशाल पानशेवडीकर , प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद पाटील चिखलीकर , अर्थोतज्ज्ञ डॉ.क्रांती शिलेदार ए डॉ. दिपक मोहिते हे डॉक्टर सेवा देणार आहेत . ज्येष्ठ अनुभवी फिजिशियन डॉ डी बी कानवटे यांनी गेली तीस वर्षा पासून शहर व आजूबाजूच्या खेड्यातील रुग्णांची सेवा केली त्यामुळे त्याचे योगदान ही भूमी कायम स्मरणात राहणारी आहे आता या शहरात ट्रॉमा केअर सेंटरमुळे रुग्ण व नातेवाईक यांना फायदा होणार आहे.