नांदेड| रेल्वे स्थानकावर झालेल्या कामगार मेळाव्याप्रसंगी रेल्वे पार्सल हमाल व माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उद्घाटक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. भाजपा नांदेड महानगराध्यक्ष प्रविण साले व भारतीय बहुजन कामगार संघाचे चे संस्थापक अध्यक्ष संजय केनेकर यांच्या उपस्थित प्रचंड उत्साहात कामगार मेळावा संपन्न झाला.
सुरुवातीला ढोल-ताशांच्या गजरात खा. चिखलीकर यांच्या हस्ते संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली. व्यासपीठावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सरदार उपेंद्रसिंघ, मनपा विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर व व्यंकट मोकले, युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, प्रदेश सचिव अनिल बोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, संभाजीनगर कामगार आघाडी अध्यक्ष शेख हाफिज, भाजपा संभाजीनगर शहर उपाध्यक्ष दीपक ढाकणे, शेख कयूम, हाजी दौलत खान पठाण हे उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे फेटे बांधून शाल श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.कसबे मामा यांच्या कामगार गीता नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड युनिटचे अध्यक्ष गोपाळराव माळगे यांनी करताना पार्सल युनिटमध्ये असणाऱ्या कामगारांचे प्रश्न मांडले. संजय केनेकर यांनी बोलताना असे सांगितले की, कामगारांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत स्वस्त बसणार नाही. प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून कामगारांच्या समस्या मांडल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रभू कपाटे, जिल्हा सचिव मनोज जाधव, कामगार आघाडी उपाध्यक्ष सागर जोशी, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, दक्षिण भारतीय आघाडी जिल्हा संयोजक अनिल गाजूला, मनोज यादव, संभाजीनगर कामगार आघाडी सरचिटणीस साहेबराव निकम हे उपस्थित होते.
दिलीप ठाकूर यांच्या संचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. आभार प्रदर्शन कसबे मामा यांनी केले. मेळाव्यासाठी कामगारांची उपस्थिती लक्षणीय होती. कामगार मेळावा यशस्वी करण्यासाठी गोपाळ माळगे व युनिट सचिव मारुती कुमार यांच्या नेतृत्वाखाली शेख अक्रम, मुकेश बेंद्रे, शेख फैय्याज, आकाश नामेवार, मुनीर भाई, प्रेम भालेराव, शेख अल्ताफ, अनिल सातपुते, डेव्हिड नामेवार ,अभिषेक माळगे, सचिन मेहेत्रे, प्रथमेश नामेवार, योगेश कांबळे ,तेजस माळगे, शेख बाबू ,गणेश गावंडे, सय्यद खय्युम यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कामगार मेळाव्याची सांगता झाली.