हिमायतनगर शहरात दुचाकी चोरून नेणाऱ्या व्यक्तीस नागरिकांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन -NNL

योग साधकांनी दुचाकी चोरट्यास पकडून दिला चोप


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर येथे सुरु असलेल्या योग सहयोग प्रशिक्षण शिबिराच्या ठिकाणी अज्ञाताने दुचाकी चोरीचा प्रयत्न केला, ही घटना दि 30 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार लक्षात येताच एका योग साधकांनी चित्रण केले तर एकाने सदर चोरट्यास रंगेहाथ पकडून चोप दिला तसेच योग वर्गात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान त्याचा साथीदार एक चोरटा फरार झाला असून, पोलिसांनी शहरात घडत असलेल्या चोरीच्या प्रकारचा तपास लावून दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाणी असून, ४६ ग्रामपंचायतीचा कारभार शहरात असलेल्या पोलीस ठाणे अंतर्गत चालविला जात आहे. या याठिकाणी तालुक्याच्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांचे संख्याबळ कमी असून, येथे नियुक्तीला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय नसल्याने नाईलाजाने अनेक जण आपल्या सोयीच्या ठिकाणी राहून ये-जा करत कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोठेही घटना घडल्यास अथवा नाईट पेट्रोलिंग करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी शहरासह तालुक्यात मटका, जुगार, देशी-विदेशी दारूची विनापरवाना विक्री आणि यासह विविध प्रकारच्या अवैध्य धंद्याबरोबर चोरी, लूटमार, घरफोडी, हत्यार बाळगणे, चाकू हल्ला करून खुनाच्या घटना घडल्याने हिमायतनगर शहर हे गुन्हेगारीचे केंद्र बनत आहे. यामुळे गुन्हेगारीला वाव मिळत असल्याचे शहर व ग्रामीण भागातील जनतेतून बोलले जात आहे. 


परिणामी दिवसागणिक होत असलेल्या घटनांमुळे नागरिकांनी झोप उडाली असून, दि.30 च्या रामप्रहरी दररोज हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालय परिसरात योग वर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबाला घेऊन दुचाकीवर येतात, या ठिकाणी सर्वजण योग वर्गात व्यस्त असल्याची संधी साधून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान गौतम हनवते यांची दुचाकी कुणीतरी अज्ञात चोरटा चोरून नेण्यासाठी धडपडत असल्याचे लक्षात आले. हा प्रकार योग साधक राजीव पिंचा यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकारचे चित्रण मोबाईल मध्ये केले. तर गजानन चायल व इतरांनी त्या चोरट्यास रंगेहाथ पकडुन चांगलेच चोपले. 

या चोरट्यास पकडल्याचे लक्षात येताच दूरवर असलेला त्याचा साथीदार चोरटा फरार होण्यात यशस्वी झाला असून, एकाला नागरिकांनी पकडून ठेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, पोलीस त्याची चौकशी करत असून, तो भोकर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. याची चौकशी केल्यास हिमायतनगर शहर व परिसरात झालेल्या इतर दुचाकी व अन्य चोरीच्या घटनेचा पर्दा फाश होईल असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. वृत्त लिहिपर्यंत पोलीस त्या अज्ञात चोरट्याची चौकशी करत असून, याबाबत कोणतीही नोंद पोलीस डायरीत झाली नव्हती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी