आज समस्त हिंदू संघटनेकडून उदयपूर येथील घटनेच्या विरोधात निदर्शने -NNL


नांदेड।
उदयपूरमधील हत्येनंतर देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका विशिष्ट धर्माची दहशत दाखवण्यासाठी एका हिंदु टेलरची निर्घुन हत्या केल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कन्हैयालाल टेलर असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तसेच अमरावती येथे सुद्धा मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची एश्याच प्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात आली,या हत्येच्या निषेधार्थ नांदेड शहरात समस्त हिंदू संघटनेच्या वतीने आज निषेध नोंदविण्यात येणार आहे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देशाच्या पंतप्रधान व गृहमंत्री यांना निवेदन देवून गुन्हेगारांना फाशी देण्यात येण्याची मागणी करण्यात येणार आहे.

यावेळी नांदेड शहरातील समस्त हिंदू व देशप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदविण्यासाठी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व  हिंदुत्ववादी संघटनेकडून व नागरिकातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी