नांदेड। दिनांक 14 जून रोजी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामपंचायत परिसरात सुमारे 9 हजार 176 वडवृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्टे देण्यात आले होते त्यापैकी नांदेड पंचायत समितीच्या माध्यमातून एकूण १६५४ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. असे गट विकास अधिकारी श्री.राजकुमार मुक्कावार यांनी माहिती दिली, नादेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून वटपौर्णिमा निमित्ताने महिलांनी वडाचे झाड लावून त्यांची पूजा करावे असे आदेश दिले होते.
नांदेड पंचायत समितीच्या अंतर्गत तालुक्यात एकाच वेळी लावण्यात आलेल्या संख्या एकूण सोळाशे चौपन्न वृक्ष लागवडी करण्यात आली,या नाविन्यपूर्ण संकल्पनेत पंचायत समितीच्या विविध विभागांनी भाग घेतला त्यामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प सर्व अंगणवाडी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यलय अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा, सर्व ग्रामपंचायतीत,उमेद अभियानातील महिला समूहांनी यात सहभाग घेतला होता.
गट विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, विस्तार अधिकारी यांच्यासह तालुकास्तरावरील खातेप्रमुखांनी त्यांच्या विभागाची जबाबदारी घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ह्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांनी अनेक नवउपक्रम जिल्हयात राबविले आहेत. वटपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात एकाच वेळी सुमारे नऊ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड पहिल्यांदाच केली आहे.
या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावागावात वडाची लागवड केली जात आहे. आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याशिवाय वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडते.
आज नांदेड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावात ही मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली,त्यापैकी गटविकास अधिकारी श्री.राजकुमार मुक्कावार यांनी सकाळी पंचायत समितीच्या मोकळ्या जागेत वडाची झाडे लावली त्यानंतर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन वृक्षारोपण केले मार्कंड,पिंपळगाव निमजी,विष्णुपुरी, नसरतपूर आदी गावात वृक्षारोपण केले,
पिंपळगाव निमजी येथे उमेद अभियानातील महिला बचत गटातील महिलांच्या हस्ते वटवृक्षाची पूजा करून वडांची झाडे ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आली.
या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वर्ग-१ श्री.राजकुमार मुक्कावार ,सहायक प्रशासन अधिकारी गणेश शिवरात्री,विस्तार अधिकारी(पं) श्री.जीवन कांबळे, श्री.गोविंद मांजरमकर,श्री.डी.के.आडेराघो, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक इरवंत सुर्यकार, विविध विभागाचे विभाग प्रमुख,सरपंच, उपसरपंच ,ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक,उमेद अभियानातील महिलां, ग्रामसंघाचे पदाधिकारी, समूह संसाधन व्यक्ती, वर्षा बोकारे ,रंजना लांमदाडे, उमेद अभियानातील महिलांची लक्षणीय उपस्थित होती.