नांदेड/हिंगोली। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गांना राज्यशासनाने राज्यमार्गाचा दर्जा दिला असून, खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे वसमत तालुक्यातील आंबा चोंडी, कुरुंदा,टोकाईदेवी,गिरगाव,तसेच नांदेड मधील मालेगाव ,पासदगाव तरोडा नाका, शिवमंदिर तरोडा बु शेलगाव दाभड ते राष्ट्रीय महामार्ग 361 पर्यंतच्या रस्त्याचा समावेश राज्यमार्गामध्ये करण्यात आला आहे .
वसमत तालुक्यातील आंबा चोंडी ते कुरुंदा टोकाईदेवी , गिरगाव रस्त्यांचे मजबुतीकरण केल्यानंतर या मार्गावरील वाढती रहदारी आणि रस्त्यांचा वाढता वापर लक्षात घेत हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी काही दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील या रस्त्याचा राज्यमार्गात समावेश करण्याची राज्यशासनाकडे मागणी लावून धरली होती. त्यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली असून, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गांना राज्यशासनाने राज्यमार्गाचा दर्जा प्राप्त होताच रस्त्याच्या कामास सुरुवात झाली.
रविवारी (ता.१२) खासदार हेमंत पाटील यांच्याहस्ते गिरगाव ते टोकाई रस्त्याचे नारळ फोडुन कामाचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत एकूण 48 किमी लांबीच्या रस्त्याचे काम होणार आहे . हा मार्ग लवकरच पूर्ण होईल व हिंगोली, नांदेड सह तेलंगणा राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना या रस्त्याचा मोठा फायदा होईल त्यांचा प्रवास सुखकर होईल आसा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके, औंढा तालुका प्रमुख अंकुश आहेर, जि .प. सदस्य माऊली झटे , गिरगांव सरपंच देविदास पाटील कऱ्हाळे, कुरुंदा सरपंच राजेश पाटील इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे, माजी सरपंच कुरुंदा दत्तारामजी इंगोले, पंढरीनाथ क्षीरसागर , लक्ष्मीकांत देशमुख, रेडगाव सरपंच धनंजय पवार, युवासेना सरचिटणीस व्यंकटेश कऱ्हाळे, संभाजी सिद्धेवार, प्रमोद भुसारे सर, शिवराज यशवंते, रोडगा सरपंच भद्रीनाथ कदम, बाबा अफूने, वसमत तहसीलदार अरविंद बोलंगे , तालुका कृषि अधिकारी कल्याणपाड, उपअभियंता परचाके व गावकरी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.