हिमायतनगर। तालुक्यातील मौजे कामारी परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी वारे व विजांच्या कडकडाट होऊन वीज कोसळून एका शेतकऱ्यांची गाय दगावली आहे, या घटनेत शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यात मंगळवारी दुपार पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. प्रचंड उकाडा होऊन सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुरू झाला. यातच कामारवाडी येथील शेतकरी रामेश्वर धोडजी लोंढे रा खैरगाव (ता) शिवार सर्व्ह नंबर 38 यांच्या शेतात नित्यप्रमाने दावणीला गाय बांधली होती, दरम्यान संध्याकाळी पाचच्या सुमारास आभाळात वीज कडाडली यात गाय जागीच ठार झाला झाल्याची घटना घडली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची गावरान गाय दगवल्याने अंदाजे 30 हजाराचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होतो आहे, यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत असून, अनेक गावातील नागरिकांना रात्रभर विज पुरवठा बंद होत असल्यामुळे नागरीकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे.
नुकतेच दुधड येथील शेतकऱ्यांचे बैल ठार झाला होता, एक शेतकरी विजेचा शेक लागल्याने गंभीर जखमी झाला होता. आज झालेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे कामारवाडी येथील शेतकऱ्याचं नुकसान झाले असून, तहसील प्रशासनाने पंचनामा करून मदत मिळून द्यावी अशी मागणी केली जात आहे.