त्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण
अर्धापूर, निळकंठ मदने। पुण्यजागर प्रकल्पाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून विद्यार्थाना विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.व व्यावसायीक दृष्टीकोनातून माहिती देण्यात येणार आहे. या इ लर्निग प्रकल्पाची सुरुवात लवकरच एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे अशी माहिती भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी दिली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,टॅब देण्यात आले.या ई-लर्निंगच्या माध्यमातून पुण्यातील विविध विषयातील तज्ञ शिक्षक तसेच साहित्य चित्र कला क्रीडा न्रूत्य आदि विषयातील तज्ञ या मुलांशी वर्षभर संवाद साधणार आहेत.
अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या पुढाकारातून पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.विद्यार्थांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावी यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात तंत्रशाळा हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी पालक मेळावा ंंघेण्यात आला. या मेळाव्याला कोंढा,देळुब,धामदरी, मालेगाव, अर्धापूर येथील पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पुण्यातील सेवा निवृत्त शिक्षण उपसंचालक अनिल गुंजाळ, शिक्षण तज्ज्ञ आर्चिता मडके, डॉ वैभव पूरंदरे , डॉ ऋषीकेश आंदळकर, दत्ता टोकलवाड, प्रतिक गाडे आदी उपस्थित होते.आत्महात्मा केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणाची सोय केली जाणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे . यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्यात आले
पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळें यांनी प्रास्ताविक करुन वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.या मेळाव्यात जिल्हा परिषद कारवाडी शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक संतोष राऊत यांची पुण्यजागर प्रकल्पाच्या तंत्रशाळेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गूणवंत विरकर गजानन मेटकर, शेख साबेर, शंकर ढगे जगन्नाथ शेटे, सुरेश वळसे यांनी पुढाकार घेतला.