शेकडो पालकांची टि सी न काढण्यासाठी शिक्षकांची मनधरणी
अर्धापूर,निळकंठ मदने। तालुक्यातील शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी शारदा भवन ची शहरात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करताच गुणवता नसलेल्या शाळांमध्ये पालकांनी जाऊन आपल्या पाल्यांची टी सी ची मागणी केल्याने तालुक्यातील अनेक शाळांचे प्रत्यक्ष धाबे दणाणले असून,आपलीच शाळा किती चांगली आहे,हे पालकांना पटवून सांगण्यासाठी अनेक शिक्षकांची नेमणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे, गुणवता नसलेल्या शाळामधील आपापली मुले- मुलींची टी सी काढण्यासाठी तालुक्यातील पालक प्रयत्नशील असल्याने विद्यार्थी संख्या कमी होणाऱ्या शाळांना फटका बसणार असून,शिक्षणाधीकाऱ्यांनी याकामी लक्ष देण्याची गरज आहे.
अर्धापूर तालुक्यातील डाॅ शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला नॅकचा अ मानांकनचा दर्जा मिळाल्याने महाविद्यालयीन शिक्षण उतम प्रकारचे आहे,पण प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी माजी मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शारदा भवनची दर्जेदार पहिली ते दहावी शाळा सुरू करण्याची पालकांची मागणी अखेर दस्तुरखुद्द पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंजूर करून प्रत्यक्ष शाळेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी प्रारंभ करण्याच्या पहिल्या दिवशी हजारावर पालकांनी प्रत्यक्ष नोंद केली.
दुसऱ्या दिवशी विक्रमी गर्दीमुळे या नवीन शाळेत विद्यार्थी संख्या वाढवावी लागणार असून, महामार्गावरील डॉ शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या ईमारतीमध्येच शारदा भवनची प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु होत असल्याने तालुक्यातील गुणवता नसलेल्या शाळांमधून पालकांनी आपापल्या मुला-मुलींची टी. सी. काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत,आता तालुक्यातील नुसती पोकळ शायनिंग करणाऱ्या शाळांचे शैक्षणिक पितळ उघडे पडले असून, विद्यार्थ्यांची टी सी देण्यास अनेक शाळांमधून टाळाटाळ करतांना दिसून येत आहे.
आता अर्धापूर तालुक्यात शारदा भवनची शाळा उतम गुणवत्ता पुर्ण चालावी यासाठी अध्यक्ष ना अशोकराव चव्हाण,माजी आमदार सौ अमिता चव्हाण,सचीव डि पी सावंत, नरेंद्र चव्हाण, डॉ रावसाहेब शेंदारकर हे बारीक लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे पालकांना या नवीन शाळेच्या गुणवता व शैक्षणिक वातावरण उतम राहील असा दाट विश्र्वास आहे,याच कारणामुळे पालकांनी या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी गर्दी केली आहे. नवीन शाळेत नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, यानंतर प्रशस्त नवीन इमारतीमध्ये पहिली ते दहावी शाळा सुरू होणार आहे.