राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून होणार साजरी -NNL

26 जून रोजी राज्यभर साजरा होणार सामाजिक न्याय दिन 


नांदेड|
बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या राजसत्तेच्या माध्यमातून प्रयत्नरत असलेले व स्वत:च्या आचरणातून सामाजिक न्यायाचा संदेश समाजात रूजविणारे थोर लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती येत्या 26 जून रोजी शासनातर्फे साजरी केली जात आहे. त्यांची ही जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाणार असून सामाजिक न्यायाच्या त्यांनी दिलेल्या योगदानाला या दिनाच्या माध्यमातून अधोरेखित केले जात आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना सन 2005-2006 मध्ये करण्यात आली होती. सदर समितीने संशोधन करून पुराभिलेख संचालनालयाला अहवाल सादर केला होता. या समितीच्या अहवालानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्म तारीख संशोधनाअंती 26 जून 1874 अशी घोषित केली आहे. हा दिन अर्थात त्यांची जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा शासना निर्णय घेतला.

राष्ट्रीय परवाना प्राधिकारचे शुल्क व संयुक्त शुल्क आता ऑनलाईन  

नांदेड जिल्ह्यातील सर्व चालक, मालक व वाहतूक संघटना यांनी राष्ट्रीय परवाना प्राधिकाराचे शुल्क व संयुक्त शुल्क www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे, असे आवाहन नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आहे. 

अर्जदाराला प्राधिकारपत्रासाठी 1 हजार रुपये शुल्क भरल्यानंतर ते स्वयंचित पद्धतीने मान्य झाल्यानंतर अर्जदारांनी 16 हजार 500 रुपये संयुक्त शुल्क भरण्यासाठी दुरध्वनी संदेश पाठविल्यानंतर ते ऑनलाईन भरता येणार आहेत. यानंतर अर्जदारांना प्राधिकारपत्राची संगणकावर प्रत काढुन सर्व नोंदणी प्राधिकरणांनी ई-स्वाक्षरी केलेले प्राधिकारपत्र ग्राह्य धरण्यात येईल, याची सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी