भाग्यनगर, नांदेड गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी; चोरीतील ६ आरोपी अटक -NNL


नांदेड|
पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी करत घरफोडीतील 06 आरोपींना पकडुन त्यांचेकडुन 2,79,050/-रुपयाचे सोन्या चांदीचे दागिणे व दोन मोटार सायकल जप्त केली आहे. एवढेच नाहीतर यांच्या अटकेतून 05 गुन्हे उघडकीस आली आहेत.

मागील काही काळामध्ये पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे साहेब, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी घर फोडया करणा-यांवर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या आदेशावरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख स.पो.नि.किनगे यांनी व त्यांचे पथकातील अमंलदार यांनी दिनाक 14 रोजी पेट्रोलींग करीत असतांना एका युनिकॉन मोटार सायकलवर तीन इसमांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली. त्यांनी आपले नाव 1. लखन पिता भीमराव ईरंडकर वय 22 वर्षे, रा. बाभुळगाव कारखाना ता. वसमज जि. हिंगोली. 2. पिराजी धुरपत पवार वय 27 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बडुरवाडा वसमत जि. हिंगोली. 3. चांदु सुग्रीव जाधव वय 29 वर्षे व्यवसाय मजुरी रा. हयातनगर, ता. वसमज जि. हिंगोली असे सांगितले व त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी व त्यांचे तीन साथीदार नामे 4. मोहम्मद मोबीन मोहम्मद जिलानी वय 30 वर्ष रा. लेबरकॉलनी नांदेड. 5. अशरफ खॉन परवेज खॉन वय 25 वर्षे रा. तेहरानगर, नांदेड व 6. भीमा नरसिंग वाघमारे वय 30 वर्ष रा. ओमकारेश्वर नगर, तरोडा बु.नांदेड यांनी घरफोड्या सारखे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यांचेकडुन खालील प्रमाणे मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन भाग्यनगर गु.र.नं. 193/ 2022 कलम 454,457,380 भा.दं.वि.मध्ये सोन्याचे दागिणे 2.6 तोळे किंमती अंदाजे 99050/-रुपयाचे जप्त केले आहेत. पोलीस स्टेशन भाग्यनगर गु.र.नं. 179/2022 कलम 454,457,380 भा.दं.वि.मध्ये सोन्याचे दागिणे 01 तोळा व व चांदीचे दागिणे 10 तोळे किंमती अंदाजे 60000/ रुपयाचे जप्त केले आहेत. पोलीस स्टेशन हदगाव गु.र.नं. 162/2022 कलम 379 भा.दं.वि. मधील एक युनिकॉन मोटार सायकल किंमती 100000/- रुपयाची जप्त केली आहे. पोलीस स्टेशन वजीराबाद नांदेड येथील गु.र.नं. 113 / 2022 कलम 379 भा.दं.वि.मध्ये एक स्पेल्डर मोटार सायकल किंमती 20,000/- रुपयाची जप्त केली आहे. 5) पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड गु.र.नं. 178 / 2022 कलम 454,457,380 भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

सदर ०४ गुन्हयातील एकुण 2,79,050/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नांदेड, प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. चंद्रसेन देशमुख, द्वारकादास चिखलीखर पो.नि. स्था.गु.शा. नांदेड व पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, पोलीस उप निरीक्षक सुनिल भिसे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत जाधव, पोहेकॉ / 2309 रावसाहेब जाधव, पोहेकॉ / 2294 किशोर हुंडे, पोहेकॉ/01 धनंजय कुभरवार, पोना / 818 प्रदिप गर्दनमारे, पोकॉ/ 516 हनवता कदम, पोकों / 710 ओमप्रकाश कवडे, पोकों / 3085 सुमेध पुंडगे तसेच सायबर सेल, नांदेड येथील पोना / 1242 राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी