नांदेड| जिल्ह्यात पाळीव श्वानांची संख्या वाढत असून त्यांच्या विविध आजारांच्या निदान व औषधोपचारासाठी पॅथाॅलाॅजी लॅब हे महत्वाचे साधन आहे असे विचार जिल्हाधिकारी डाॅ विपीन इटनकर यांनी मांडले.
नांदेड मधील ज्येष्ठ पशुवैद्य डाॅ. विजय लाड यांच्या स्टेडियम संकुलातील पशु चिकित्सालयात पॅथाॅलाॅजी लॅबचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांनी श्वानांसाठी रक्त तपासणी प्रयोगशाळेची नांदेड शहरात गरज होती ती पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करून पाळीव श्वानांचे आजारावर वेळेत औषधोपचार होण्यासाठी डाॅ. विजय लाड यांनी चालू केलेल्या पॅथाॅलाॅजी लॅब चे कौतूक केले.
डाॅ. विजय लाड यांनी मागील पंवीस वर्षांपासुन नांदेड शहरातील श्वानांसाठी औषधोपचार, लसीकरण व शस्त्रक्रिया अशा सेवा दिल्याचे सांगितले. स्टेडियम संकुलातील पशु चिकित्सालयामध्ये आता श्वानांचे रक्त तपासणी करुन लिव्हर, किडनी अशा महत्वपूर्ण अवयवांच्या व्याधींवरील व्यांधींचे निदान होऊन वेळेत औषधोपचार करता येतील हा विश्वास व्यक्त केला.
श्वानांसाठी चालु झालेल्या या रक्त तपासणी पॅथाॅलाॅजी लॅबच्या उभारणीसाठी नांदेडचे तहसिलदार श्री किरण अंबेकर व त्यांच्या कुटूंबियांनी ही संकल्पना उचलून धरली व प्रेरणा दिली अशी कृतज्ञता डाॅ. लाड यांनी यावेळी व्यक्त केली.पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. प्रविणकुमार घुले यांनीही पॅथाॅलाॅजी लॅब साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी लाड, संतोष कांबळे, सौ. स्वाती पेशवे, तेजस लाड यांनी परिश्रम घेतले.