लोहा| गंगाखेड येथील कृतिशील शिक्षक नागनाथ माणिकराव नागरगोजे यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. पूर्णा तालुक्यातील खडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांनी पदभार स्वीकारला .
उखळी येथील भूमिपुत्र नागनाथ माणिकराव नागरगोजे हे उपक्रमशील शिक्षक आहेत त्यांनी पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळस अंतर्गत ,खडाळा येथील शाळेत पदोन्नती उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आहेत.
एन एम नागरगोजे यांचे रुजू झाल्या नंतर केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के व केंद्रीय मुख्याध्यापक दयानंद स्वामी या यांनी त्यांचा सत्कार केला. कमलापूर शाळेचे मुख्याध्यापक बापूराव पलये ,माखणी शाळेचे मुख्याध्यापक संजय जोशी, शिक्षक कैलास सुरवसे, विष्णू कुंभार यांची उपस्थिती होती. उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाल्या बद्दल एन एम नागरगोजे व त्याच्या सुविद्य पत्नी सौ वर्षाताई नागरगोजे यांचा सत्कार हरिहर धुतमल व सौ शिल्पा हरिहर धुतमल या दाम्पत्यांनी केला.