व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी अपंग प्रशिक्षण केंद्रात अर्ज करण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 15 ते 45 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींसाठी तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत प्रवेश देण्यात येत आहे. 

इच्छुक अपंग मुला-मुलींनी, पालकांनी शुक्रवार 15 जुलै 2022 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरीनगर, रामपूर रोड, देगलूर जि. नांदेड मोबाईल क्रमांक 9960900369, 9175446411, 7378641136, 9503078767 येथे संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन देगलूर तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण संस्थेच अधिक्षक यांनी केले आहे.   

प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण ( सीसीईन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॅाम्प्युटर टायपिंग), वेल्डर कम फॅब्रीकेटर, शिवण व कर्तनकला आणि इलेक्ट्रीशिएन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची  विनामुल्य सोय केली आहे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या नवीन पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन 

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाअंतर्गत सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड मुख्यालय औरंगाबाद 16 डिसेंबर 2021 पासून समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीचे कार्यालय पुढील पत्त्यावर सुरु करण्यात आले आहे. तरी संबंधितानी पुढील नमूद पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन किनवट मुख्यालय औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष विजयकुमार कटके यांनी केले आहे. 

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड (मुख्यालय औरंगाबाद) कार्यालयाचा पत्ता याप्रमाणे आहे. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट (मुख्यालय औरंगाबाद). प्लॉट नं. 4 , सेक्टर सी-1, टाऊन सेंटर, सारस्वत बँकेजवळ, सिडको औरंगाबाद -431 003 कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 0240-2991137 व ई-मेल आयडी क्र. tcskin.mah@gmail.com  हा आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी