उदयपूरच्या अमानुष हत्येचा नांदेडमध्ये निषेध....NNL


नांदेड|
नूपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉटसॲपवर स्टेटस् ठेवल्याच्या खुनशीतून दोघा माथेफिरुनी उदयपूरमध्ये टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाची अमानुष हत्या केली आहे. उदयपूरमधील रहिवासी कन्हैय्यालाल याने नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे माथे फिरलेल्या दोन तरुणांनी त्याच्या दुकानात घुसून धारदार शस्त्रांनी त्याचा गळा कापला. ही घटना भरदिवसा घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. 

नांदेडमधील टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या मेरु शिंपी समाजाची बैठक बुधवारी, २९ जून रोजी कोसबतवार कॉम्पलेक्स शिवाजीनगर नांदेड येथे झाली.बैठकीत या अमानुष घटनेचा निषेध करीत मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या बैठकीला सतीश गटलेवार, राजू श्रीरामवार, नंदकुमार कोसबतवार, सत्यनारायण कोकू, मधुकरराव रेणगुंटवार, रमेश गटलेवार, रमाकांत रापतवार, रमेश यन्नावार, बजरंग रामपटवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी