गणित विषय अभिरुची निर्मितीसाठी जि.प.चा उपक्रम; जिल्हा परिषद शाळांना गणित पेटीचे वितरण -NNL


नांदेड|
जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेडच्यावतीने जास्त पटसंख्या असलेल्या 40 माध्यमिक प्रशालांना 40 यशवंत गणित पेटीचे वितरण करुन गणित या अमूर्त विषयास सोपे करण्यासाठी  शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी अत्यंत उपयुक्त व विद्यार्थीहितदक्ष निर्णय घेत प्रत्येक शाळेस मोफत यशवंत गणित पेटीचे नुकतेच वितरण केले. 

प्रथम गणित पेटीचे वितरण संस्कार, गुणवत्ता व प्रगती अशा त्रिसूत्रीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण विकसित होत असलेल्या आदर्श प्रशाला जि.प.हा.विष्णुपूरीस करण्यात आले. या  सोहळ्याचे वितरण इयत्ता सातवी ब सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गात मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी,विषय शिक्षक विकास दिग्रसकर, उदय हंबर्डे,विज्ञान विषयाचे जेष्ठ शिक्षक तथा प्रभारी पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, निष्णात गणित शिक्षक कृष्णा बिरादार,गणित पेटी वितरक शत्रुंन्जय येवतीकर व अंबर देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

याप्रसंगी यशवंत गणित पेटीचे निर्माते यशवंत येवतीकर यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. अशा प्रकारच्या विद्यार्थी उपयुक्त गणित पेटीचे मोफत वितरण केल्यामुळे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे,शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले. या गणित पेटीमुळे गणित विषयात अभिरुची निर्माण होवून गणित विषय सोप्या पध्दतीने समजण्यास भरीव मदत होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी