नयन बाराहाते जन्मदिन स्मरण आज विविध कार्यक्रमाचे आयोजन -NNL

अतुल पेठे, संजय आवटे, प्रमोद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती  


नांदेड|
ज्येष्ठ चित्रकार, लेखक, कवी, पत्रकार अशा अनेक भूमिका साकारून नांदेडमध्ये सेवा करणाऱ्या नयन बाराहाते यांच्या जन्मदिनी दि.३० जून रोजी सायं ६ वा.येथील कुसुम सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला दिग्दर्शक अतुल पेठे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे व चित्रकार प्रमोद कांबळे या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. 

नयन बाराहाते यांनी साकार केलेल्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन येथे भरवण्यात येणार आहे. मूळचे नागपूरचे असलेले नयन बाराहाते नांदेडकर केव्हा झाले हे कळले नाही. त्यांनी नांदेडमध्ये राहून महाराष्ट्रातल्या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला. नांदेडची सांस्कृतिक मनोभूमी तयार करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या एकूण जीवनावर आधारित लघुपट चलचित्राच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. नयन  बाराहाते यांच्या नावाने दिला जाणारा पहिला चित्रकार पुरस्कार प्रख्यात चित्रकार प्रमोद कांबळे यांना दिला जाणार आहे. 

याच निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत संजय आवटे यांचे सामाजिक परिप्रेक्षावर भाष्य करणाऱ्या 'नव्या युगाला सामोरे जाताना' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नयन बाराहाते मित्रपरिवार आणि सृजन  कम्युनिकेशन परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी