ज्येष्ठ नागरिकांच्या व्यापक बैठकिचे आयोजन- डाॅ.हंसराज वैद्य -NNL


नांदेड।
ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न  आजूनहि, हे म.वि.आ.शासनहि सोडवू शकले नाही.किंबहूना स्वतःचे मानधन वाढऊन घेणें व सातवा वेतन आयोग एकमताने  लागू करण्या पुढे त्यांना ज्येष्ठांच्या प्रलःंबित  मागण्यांचा प्रश्न कदाचित किरकोळ वाटला असावा..!

एकून लोक संख्येच्या आठरा टक्के ज्येष्ठ नागरिक हे शंभर टक्के मतदान करणारा अनुभवी मतदार आहे.एक ज्येष्ठ नागरिक हा घरचेच किमान सहा मतदाराचे(स्वतः पती पत्नी,मुलगा सुन व मुलगी जावाई)मतदान फिरऊ तथा वळऊ शकतो. अजूनहि वेळ गेलेली नाही.नाकाचा शेंडाआताहि साबूत ठेवता येऊ शकेल. गेल्या जवळ जवळ तिस पस्तिस वर्षा पासून ज्येष्ठांची शिखर महासंघ ( FESCOM) ज्येष्ठांचे धोरण अंमलात आणावे, वैश्विक व देशातील इतर राज्या प्रमाने ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष साठ हेच ग्राहय धरावे, शेजारिल राज्या प्रमाणे शोषित, गरजू , दुर्लक्षित ,वंचित तथा उपेक्षित शेतकरी,
शेतमजूर, कष्टकरी कामगार तथा पिचत पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहा फक्त दोननदाचे  जेवन व दोनदाचे चहा पाणी यासाठी प्रतिमहा 3500/-रू. मानधन मिळावे या मागण्यांसाठी व इतर किरकोळ मागण्या मान्य करून घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशिल आहे.    

साठ वर्ष वअधिक ज्येष्ठांना या साठी रस्त्यावय उतरून धरणे,रस्तारोको,भिक मांगो, बैठे सत्याग्रह ,लाक्षणिक उपोषणादि आंदोलने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हजारो ज्येष्ठ नागरिकांना करावे लागले. तरिही निद्रिस्त शासनास जाग आली नाही. आणि याच कारणास्तव पुन्हा अंदोलनाची गती व दिशा ठरविण्या साठी येत्या महिण्याच्या पहिल्या रविवारी (3/7/2022) सकाळी ठिक 11.00 वाजता सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबादच्या वतिने एका व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.ही बैठक स्वा.सेनानी डाॅ.दादारावजी वैद्य प्रेक्षागृह,वैद्य रूग्णालय परिसर तळ मजला येथे घेण्यात येणार आहे. बैठकीला अनेक ज्येष्ठ नागरिक नेत्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तेव्हां नांदेड शहर व नांदेड जिल्ह्यातील सर्व संघातील नेते व कार्य कर्त्यानी,तसेच इतर ज्येष्ठ नागरिक संघटना नेते तथा कार्य कर्ते आणि ज्येष्ठ नागरिक प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्तित रहावे असे आवाहान डाॅ. हंसराज वैद्य अध्यक्ष नांदेड जिल्हा संघ समन्वय समिती यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी