दिव्यांगानी संगणकिय ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र शिबिराचा लाभ घ्यावा- जिवराज डापकर -NNL

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने जि. प. गट, मंडळ निहाय दिव्यांग शिबिराचे आयोजन


हदगाव।
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वतंत्र दिनापुर्वी जिल्ह्यात 75 शिबिराद्वारे 7500 दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा निर्धार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या निर्धाराने 1 जुलै ते 10 ऑगस्ट पर्यंत सर्व तालुक्यात दिव्यांगासाठी ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. व तसेच या शिबिराचे सुरुवात नांदेड जिल्ह्यात सर्व प्रथम हदगांव येथील उप जिल्हा रुग्णालयात दि.1 जुलै रोजी ठिक 10:00 वाजता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर आणि उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, समाज कल्याण अधिकारी राजु ऐडके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शिबिरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठा डॉ. पि.टी.जमदाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंळ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. संतोष शिरसीकर व तहसिलदार जिवराज डापकर, गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड व दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांच्या उपस्थितीत या दिव्यांग शिबिराचे सुरुवात होणार आहेत.

ज्या अस्थिव्यंग व नेत्रहिण दिव्यांगाकडे जुने हस्त लिखित दिव्यांग प्रमाणपत्र आहेत. व  नविन (अस्थिव्यंग व नेत्रहिण ) दिव्यांगानी आज पर्यंत ऑन लाईन दिव्यांग प्रमाणपत्र काढले नाहीत.अश्या दिव्यांगाना जि.प. गट , मंडळ निहाय या शिबिराव्दारे संगणकिय ऑन लाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (युडी आयडी) कार्ड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या शिबिराचे विशेष आयोजन हदगांव तालुक्यात उप जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले आहेत.* 1 जुलै रोजी निवघा मंडळ, 8 जुलै रोजी पळसा जि. प. गट, 15 जुलै रोजी रुई जि. प. गट, 22 जुलै रोजी आष्टी जि. प. गट, 29 जुलै रोजी तामसा जि.प. गट आणि 5 ऑगस्ट रोजी मनाठा जि. प.गटातील दिव्यांगानी ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्रासाठी ठरवुन दिलेल्या जिल्हा परिषद गट आणि मंडळ निहाय तारीखे प्रमाणेच दिव्यांग व्यक्तींने आपले ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र करुन आपले आधार कार्ड, राशन कार्ड, पास फोटो व ईतर मुळ कागदपत्रासह या शिबिरात दिव्यांगानी उपस्थित राहुन या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवहान हदगांव‌ तालुक्याचे तहसिलदार जिवराज डापकर यांनी केले आहेत.

तसेच तालुक्यातील कोणताही दिव्यांग व्यक्ती ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र व त्यांच्या हक्कांपासून वंचित राहू नये यांची सर्व शासकीय यंत्रणेने विशेष काळजी घ्यावी. या शिबिरासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग, सर्व तलाठी व ग्रामसेवक आणि ग्राम पंचायतीच्या समन्वयातुन दिव्यांगाला दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी त्या - त्या गांवातील दिव्यांगाला मंडळ निहाय उपस्थित करावे. यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीने 5 टक्के निधीतुन त्यांच्या जाण्या-येण्याची व नाष्टा पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. व तसेच या शिबिरात दिव्यांगाची हेळसाड व त्रास होता कामा नये. या शिबिरात कोणत्याही कर्मचारीने हलगर्जीपणा करु नये. यांची संपुर्ण खबरदारी घ्यावी. अन्यथा संबंधितावर कडक कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती हदगांव तालुक्याचे तहसिलदार जिवराज डापकर यांनी दिले आहेत. 

या शिबिरासाठी आज उप जिल्हा रुग्णालयात विशेष बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत त्यांच्या सोबत उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, गट विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, वैद्यकिय अधिक्षक डॉ.व्हि.जी. ढगे, डॉ. प्रदिप स्वामी, डॉ.स्मिता टेंगसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे व कदम, पं.स. चे विस्तार अधिकारी प्रदिप सोनटक्के, दिव्यांग सहाय्यता कक्ष प्रमुख माधव आवळे, तलाठी मुंगल, सुनिल तोगरे, दिव्यांग शाळेचे शिक्षक गजानन मोरे, सुदेश आगरकर, शिवकुमार काष्टे, राम वट्टमवार, शेख आसिफ,सचिन माने, संतोष जाधव व महसुल आणि पं.स कर्मचारी, आणि ईतर संबंधीत सर्व शासकीय अधिकारी या बैठकीत उपस्थित होते...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी