नांदेड। निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. परंतू एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. हे खरे असले तरी आज अनेकजण निसर्गाचा विचार न करता स्व: ताच्या स्वार्थासाठी अपार जंगलतोड करत आहे.
त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन निसर्गाच्या चक्रात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा निसर्गाचा ढळत चाललेला समतोल पुन्हा सावरण्यासाठी गोदावरी फाउंडेशन हिंगोलीच्या वतीने महिलांना पंचवटी वृक्षाचे वाटप करण्याचा संकल्प खासदार हेमंत पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील व गोदावरी अर्बन चे चेअरमन धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे. गोदावरी फाउंडेशन हिंगोलीच्या वतीने पंचवटी वृक्ष वाटप आज रोजी जलेश्वर मंदिर गाडीपुरा येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता मुळे, ज्योती कोथळकर, सुमित्रा रामगिरवार, सुरेखा कटके, भारती महाजन, कीर्ती लदनिया, यशोदा कोरडे, नैना पैठणकर, सिमा पोले, सुषमा कदम, लता सूर्यवंशी, रूपाली साहू, राखी झवंर, ज्योती वाघमारे, पल्लवी सुळे, रूपाली क्रापरतवार, राजश्री खंदारे, आशा भायेकर, अनिता शर्मा, प्रतिक्षा देशपांडे, रेखा इंदुरिया, राधिका पांडे, शारदा वर्मा, निर्मला जाधव, यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी अर्बनचे व्यवसाय विकास व्यवस्थापक प्रदीप देशपांडे, शाखा अधिकारी अंकुश बिबेकर, अधिकारी रंजना हरणे, जय देशमुख, विशाल नाईक, रक्षंदा मुक्कीरवार, ममता ओझा, श्रुती मद्रेवार, प्रविण पाईकराव, शुभम टवले, तसेच गोदावरी फाउंडेशनचे हिंगोली जिल्हा समन्वयक सोनल सुलभेवार, शिवाजी पातळे, जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक, विठ्ठल कावरखे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.