दिल्ली। केंद्र सरकारने 'अग्निपथ' योजना राबविली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी तरुणांचे स्वप्न साकार होणार आहे. कॅबिनेट समितीने 'अग्निपथ' योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेतंर्गत तरुणांना भारतीय सैन्य दलात सेवेची संधी मिळणार आहे. असे माहिती मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या 80 टक्के तरुणांची सेवा 4 वर्ष झाल्यानंतर समाप्त होणार आहे. राहिलेल्या 20 टक्के सैनिकांना पुन्हा तिन्ही भारतीय सैन्य दलात काम करण्याची संधी मिळून दिली जाईल. 20 टक्के भारतीय सैनिकांना निवृत्तीनंतर पुन्हा परत बोलावण्यात येईल. त्यांना रुजू होण्याकरिता नवीन तारीख दिल्या जाईल. वेतन व निवृत्तीवेतन ठरवण्यासाठी त्यांच्या सेवेची मागील 4 वर्षांची कंत्राटी सेवा धरल्या जाणार नाही.
भारतीय सैन्य दलाचे सरासरी वय 35 वर्षांवरून 25 वर्षांपर्यंत कमी होईल. अग्निपथ योजनेतंर्गत तिन्ही दलात पहिल्या वर्षी 25 हजारांहून अधिक तरुणांची भरती केल्या जाणार आहे. अग्निपथ योजना यशस्वी झाल्यानंतर सरकारची पगार, भत्ते व पेन्शन मध्ये हजारो कोटींची बचत होईल, असा अंदाज सशस्त्र दलाने वर्तविला आहे. या योजनेमुळे अनेक तरुणांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. ही माहिती पुढे नक्की इतरांना पाठवा.