मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव -NNL


नांदेड|
श्री शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड येथे  मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने शाळा व महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी तथा माजी आमदार संस्थेचे सचिव गुरुनाथराव कुरुडे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था सहसचिव अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे,  प्रा.डॉ.पूरणशेट्टीवार व्यंकटलक्ष्मी, श्री. शि.मो.ए.सो.कंधार चे संचालक प्रा.वैजनाथराव कुरुडे , शालेय समिती सदस्य मधुकरराव पी.कुरुडे तसेच शालेय समिती सदस्य तथा माजी कार्यालयीन अधीक्षक मा.सूर्यकांत कावळे व नवनिर्वाचित शालेय समिती सदस्य तथा कार्यालयीन अधीक्षक इंद्रजीत बुरपल्ले , प्रा.डि.बी.जांबरुनकर तसेच प्रा.गजाननराव पांपटवार  यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्ड परीक्षा मार्च 2022 मधील कला , वाणिज्य व विज्ञान शाखेतील माणिक नगर व नवीन कौठा शाखेतून प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने गुणगौरव करण्यात आला तसेच मेडिकल प्रवेशास पात्र , नीट , जेईई मध्ये प्रवेशास पात्र  झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा गुणगौरव करण्यात आला याबरोबरच राष्ट्रीय सायकलिंग क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल खेळाडूचे सुद्धा अभिनंदन करून गौरव करण्यात आला. बारावी बोर्ड परीक्षा 2022 मध्ये विषय निहाय प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांचा विषय शिक्षकाकडून प्रत्येकी एक हजार एक रुपये व शालेय साहित्य बक्षीस देऊन गुणवंताचा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे , उप मुख्याध्यापक डि.पी.कदम, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड, पर्यवेक्षक माधव ब्याळे , माध्यमिकचे पर्यवेक्षक शिवराज पवळे, सदानंद नळगे, कौठा इन्चार्ज प्रा. सय्यद जमील, ज्येष्ठ प्रा. मुरलीधर घोरबांड, प्रा. वसंत राठोड, प्रा.लुंगारे ज्ञानेश्वर, प्रा. अमर दहिवडे , प्रा.जयवंत यानभुरे, प्रा.श्रीवास्तव दिपक , प्रा. देशमुख शिवशंकर, प्रा.दिग्रसकर योगेश, प्रा.शेख उमर, प्रा.गोविंद मोरे, प्रा.सोनटक्के शिवानंद, प्रा.गायकवाड संतोष, प्रा. विक्रम लुंगारे , प्रा.कपील सोनकांबळे,  प्रा. संगिता स्वामी , प्रा.प्रतिभा जाधव, प्रा.दिपा जामकर , प्रा.रत्नमाला नवघरे, प्रा. रेश्मा शेख , 

प्रा.शिल्पा पारेकर, प्रा.वैशाली दुलेवाड, प्रा.तेजस्विनी कोंडेकर, प्रशांत कुरुडे, बालाजी निरपणे, समर्थ लोखंडे, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास पतंगे , सहाय्यक प्रा.निलेश मोरेश्वर आणि प्रा.रूपाली कळसकर या सर्वांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.निलेश मोरेश्वर आणि प्रा. रूपाली कळसकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी तुळसाबाई शिंदे, संतोष भांगे, प्रभाकर जाधव यांचे ही योगदान मोलाचे ठरले. या कार्यक्रमाची सांगता. ढोल ताशाच्या गजरात लयबद्ध तालात व सुरात राष्ट्रगीताने प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांनी केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी