नांदेड| जुन्या नांदेडमधील रहिवासी जानकाबाई दिगंबरराव जोशी अंबुलगेकर यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी, १४ जून रोजी रात्री १०.४५ वाजता निधन झाले. गत काही महिन्यांपासून त्या शहरातील अयोध्यानगरीतील रहिवासी व कन्या कुसुम साधू कंधारकर यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होत्या.
जानकाबाई या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ३ भाऊ, ३ मुली,जावई,२ मुले,सुन,नातवंडे,पणतू असा परिवार आहे. रवीगुरु अंबुलगेकर यांच्या त्या मातोश्री तर दामोदरराव उमरीकर यांच्या त्या भगिनी होत.त्यांची अंत्ययात्रा अयोध्यानगरी येथून गोवर्धनघाटवर नेण्यात आली. तेथे बुधवारी, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.