हदगाव, शे चांदपाशा| वैरणाच्या शोधात रानावनात जाणाऱ्या गुराना नदी नाले व पाझर तलाव आटल्यामुळे पिण्याकरिता पाणी मिळत नाही. गुरे पाण्याकरिता व्याकुळ होत असून, आपली व्याकूळता प्रक्रट करु शकत नसल्याने शहरव परिसरात जनवारांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने व भुक भागविण्यासाठी भटकत कँरीबँग आणि प्लास्टिक सहीत्य सेवन करित आहेत. यामुळे जनावरांच्या 'कोठीपोटामध्ये कँरीबँग जात असल्याने जनावरांना अपचन होऊन पोटफुगी कोठीपोट गच्च होत आहे.
नुकतेच जिल्हाधिकारी यांनी प्लास्टिक कैरीबेग बंदीच्या बाबत उपक्रम सुरु केला. मात्र या उपक्रमाची अंमलबजावणी होत नसल्याने निर्जीव वस्तु खाण्याच्या सवय मुळे रंवथ करणाऱ्या जनावरामध्ये शिळे अन्नचे कँरिबँग जात आहेत. हदगाव शहरातील नागरिक अण्णा भरून कैरीबेग कच-या मध्ये टाकत आसल्याने ते जनावरा करिता जीवघेणी बनत आहे. प्लास्टिक पदार्थाच्या सेवनामुळे जनवारांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.
या बाबतीत हदगाव शहरासह तालुक्यात प्लास्टिक बंदी बाबतीत जनजागृती व प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाला होणारे गंभीर परिणामाची जनजागृती होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने हदगाव शहरासह तालुक्यात कैरीबेगचा सर्रास वापर होत असल्याने जनावरांसाठी हि बाब धोकादायक बनली आहे. यासाठी जनजागृती होणे फार अवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करित आहे.