मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त महाआरोग्य शिबिर -NNL

एकाच छताखाली 40 तज्ञ डॉक्टर करणार हजारो रुग्णांची तपासणी


नांदेड |
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.14 जून रोजी लिंबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांच्या पुढाकारातून महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन लिंबगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लिंबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.14 जून रोजी सकाळी 10 वाजता हे शिबीर आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरात या शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, अस्थीरोग, स्त्रीरोग, पोट विकार, कान, नाक, घसा, न्यूरो आदी जळपास 40 तज्ञ डॉक्टर रुगणांची तपासणी करून आजाराचे निदान व उपचार करणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 9921447000 व 8308371930 या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी व या महाआरोग्य शिबिराचा  गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी