अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील पार्डी येथील तरुणांने जिद्द व मेहनतीच्या जोरावर अखेर मुंबई गाठून अनेक छोट्या-मोठ्या पडद्यावर काम मिळाले असून,त्यांच्या एन्ट्री ने गावातला नट सर्वत्र झळकला आहे.
नांदेड शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता या खेडेगावातील योगेश डोईफोडेस बालपणापासूनच सिनेमाचं अभिनयाचं मोठं वेड होते. त्याने त्याचा तोच छंद जोपासत तो आता मोठ्या पडद्यावर अभिनय करत आहे. छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम करत करत थेट चित्रपटांमध्ये योगेश ला काम करण्याची संधी मिळाली. तो सध्या उत्कृष्टपणे अभिनयाचे काम पार पाडत आहे. तालुक्यातील पार्डी येथील तरूण योगेश विठ्ठलराव डोईफोडे मराठी सिनेसृष्टीतील " वेड " या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने गावकऱ्यांनी सत्कार केला.
मुंबई सारख्या मोठ्या शहरात सुध्दा गावगाड्यातील सर्व सामन्याला कॅरियर घडविण्यासाठी अनेक संध्या असल्याने तरूणाने संधी दडवू नये असे आवाहन यावेळी आमच्याशी बोलतांना योगेश डोईफोडे ने व्यक्त केले आहे. पार्डी येथील योगेश विठ्ठलराव डोईफोडे याला बालवयातच नाटक व सिनेमे बघण्याची आवड होती त्याची आवड एक दिवस त्याचे भवितव्य घडेवेल यासाठी त्याने मुंबई गाठली मुंबईत गेल्याने आपल्याला निश्चितच काहीतरी होण्याची संधी प्राप्त होईल या ध्येयाने प्रेरित होऊन प्रथम बाळू मामाच्या नावाने चांगभलं या नाटकात काम करण्याची संधी प्राप्त झाली. उत्तम अभिनय केल्याने गाथा नवनाथाची, स्वराज जननी माॅसाहेब जिजाऊ,मेरे साई,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नाटकात काम करण्याची संधी उपलब्ध झाली. तसेच सिनेअभिनेते रितेश देशमुख निर्मित मराठी चित्रपट "वेड" या सिनेमात अभिनय करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने सिनेसृष्टीत ग्रामीण भागातील तरुण सुद्धा एक से बढकर एक अभिनव करू शकतात.
असे अनेक दिग्दर्शकांना लक्षात आल्याने ग्रामीण भागातील तरुणांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात नावलौकिक करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे आव्हान योगेश डोईफोडे यांनी केले आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव निलेश मदने,सेवादल तालुकाध्यक्ष बाळू पाटील धुमाळ, जितेंद्र देशमुख,हरी भक्त पारायण गोविंद माऊली पार्डीकर,हरी भक्ती पारायण बाबुराव महाराज भांगे, पत्रकार सखाराम क्षीरसागर,महा मृत्युजंय दुत गोविंद टेकाळे,संदिप राऊत,आनंद मोरे आदींनी सिनेकलाकार योगेश विठ्ठलराव डोईफोडे यांचा सत्कार करतात भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.