उस्माननगर, माणिक भिसे। नविन शाळा किंवा एखादी गोष्ट सुरू होत असताना ,त्या ठिकाणी क्रांती ,प्रतिक्रांती विरोध चालत आसतात.पण विरोध न होता प्रत्येक शाळेने स्पर्धेत गुणवत्तेत प्रगती करुन विद्यार्थी यशस्वी घडवावेत असे प्रतिपादन भिमाशंकर महाविद्यालयाचे प्रा.विजयभिसे यांनी केले. ,
उस्माननगर ता.कंधार येथील कोलंबस व्हर्सटाईल सोशल फाउंडेशन संचलित तालुक्यातील एकमेव ( NCERT) मान्यता प्राप्त अभ्यासक्रम राबविणारे तालुक्यातील जाॅन ड्युई इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे उस्माननगर येथे उद्घाटन कंधार पंचायत समितीच्या मा.सभापती सौ.लक्ष्मीबाई व्यं.पा.घोरबांड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.हा.कलंबर शाळेचे सहशिक्षक वामन लोंढे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष पत्रकार गणेश लोखंडे,मा.जि.प.सदस्या प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते माधवराव भिसे,प्रा विजय भिसे, दत्ता पाटील घोरबांड,ग्रा.प.सदस्य कमलाकर शिंदे, गोविंद पोटजळे , गंगाधर भिसे, माधवराव काळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा.भिसेसर म्हणाले की , मागील काळात मोबाईलमुळे चांगलेही परिणाम झाले आहेत. व वाईट परिणामही दिसून आले आहेत.पालक आणि विद्यार्थी जर सुशिक्षित असेल तर तिथे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलमुळे चांगले परिणाम झाले. संगणकाचे ज्ञान कसे घेतले पाहिजे,त्याचे ज्ञान इंग्लिश स्कूल मध्ये दिले जाते. म्हणून जग ज्या दिशेने वाटचाल करीत आहे .,त्याची जर स्पर्धा करायची असेल तर आपणाला तंज्ञानात्मक शिक्षणातून पुढे गेलेच पाहिजे ,ही काळाची गरज आहे.
खडू अन् फळा घेऊन पूर्वीसारखे अ,आ, इ, ई, जर शिकत आसलो तर त्याची स्पर्धा करू शकणार नाही.मला त्या खडू व फळाचे योगदान आहे.हे मी नाकारत येत नाही. आजच्या काळात, युगात तंत्रज्ञानात्मक शिक्षणाची जोड देणे ही काळाची गरज बनली आहे.शिक्षकांनी स्पर्धात्मक परीक्षा घेऊन यशस्वी विद्यार्थ्यी घडवावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा. गंगाप्रसाद भिसे यांनी जाॅन ड्युई इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल विषयी प्रास्तावना केली.तर गणेश लोखंडे, माधवराव भिसे, कमलाकर शिंदे, दत्ता पाटील घोरबांड. यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक प्रा.अॅड.नागन भिसे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सचिव प्रा.रुपेश भिसे,राजू सोनटक्के, डिंगाबर भिसे,राजु भिसे, सखाराम भिसे,माधव भिसे,दिपक भिसे, मारुती वाघमारे, यांनी परिश्रम घेतले.