अर्धापूर। तालुक्यातील खैरगाव येथील कु. प्राप्ती भगवानराव गव्हाणे या मुलीने बारावी कला शाखेत ९२.६७ टक्के गुण मिळवून श्री. छ. शिवाजी ज्यू. कॉलेज बारड, तालुका मुदखेड या शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. ग्रामीण भागातल्या मुली आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या विळाख्यामुळे शिक्षणाचे अतोनात न भरून येणारे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत प्रथमच ऑफलाइन व विश्लेषणात्मक पद्धतीने झालेल्या या उच्च माध्यमिक परिक्षांचे निकाल दि. ८ जून रोजी घोषित झालेले आहे.
अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे यांची पुतणी कु. प्राप्ती गव्हाणे हिने ग्रामीण भागातून उच्च माध्यमिक परीक्षेत उंच भरारी घेतल्याबद्दल आई-वडील, शिक्षक व मित्रपरिवारांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात.